Medo-Persian Kingdom बद्दल बायबलमधील वचने: Put to death all who approached them without permission
Put to death all who approached them without permission बद्दल वचने
“राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.”
“जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”