मुख्य मजकुरावर जा

Lasciviousness बद्दल बायबलमधील वचने

68 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;

  2. त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

  3. तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.

  4. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  5. तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.

  6. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.

  7. तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.

  8. कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.

  9. तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.

  10. मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही.

  11. ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते.

  12. तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते,

  13. “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते,

  14. “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”

  15. परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत.

  16. “मला फारच आश्चर्यचकित करणार्‍या तीन गोष्टी आहेत. चार गोष्टी मला समजत नाहीत:

  17. गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?

  18. “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’

  19. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे,

  20. बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा

  21. या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

  22. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले

  23. आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.

  24. याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अशुद्धतेच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली.

  25. परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.