Lasciviousness बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,
जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.
निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.
कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,
असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,
तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्याचे घर समृद्ध होऊ नये.
तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.
तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला! माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!
मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्यांकडे मी कानाडोळा करीत असे.
माझ्या घराच्या खिडकीच्या जाळीतून मी खाली पाहिले.
साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.
तो तिच्या रस्त्याच्या कोपर्याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.
दिवसाच्या संधिप्रकाशात, संध्याकाळच्या अंधारात होता.
तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.
(ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.)
तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:
आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.
म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!
मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.
ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!