मुख्य मजकुरावर जा

Lasciviousness बद्दल बायबलमधील वचने

68 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.

  2. तसेच पुरुषही स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध सोडून एकमेकांविषयीच्या अभिलाषेने कामातुर होऊन, त्यांनी एकमेकांशी लज्जास्पद कर्मे केली, याचा परिणाम असा झाला की त्यांना त्यांच्या अपराधांची योग्य शिक्षा मिळाली.

  3. यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.

  4. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले.

  5. अशा वाईट गोष्टी करणार्‍यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी,

  6. चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.

  7. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव घेऊन तो वेश्येशी एक करावा काय? कधीच नाही!

  8. जर कोणी वेश्येबरोबर जोडला जातो, तेव्हा ती त्याच्या शरीराचा भाग होते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो, “ती दोघे एकदेह होतील.”

  9. परंतु जो कोणी प्रभूशी जडला आहे तो आत्म्याने त्यांच्याशी एक झाला आहे.

  10. व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो.

  11. देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,

  12. मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट,

  13. हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

  14. प्रभूच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका.

  15. कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत.

  16. सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत.

  17. याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात.

  18. कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला.