मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही त्यांना आत, तुमच्या वतनाच्या पर्वतावर आणून रोपणार; तेच ठिकाण याहवेह, जे तुम्ही आपल्या निवासासाठी तयार केले, ते पवित्रस्थान जे, हे प्रभू, तुमच्या हातांनी प्रस्थापित केले.

  2. याहवेह सदासर्वकाळ राज्य करतील.

  3. जेव्हा फारोहचे घोडे, रथ आणि घोडेस्वार समुद्रामध्ये गेले, तेव्हा याहवेहने समुद्राचे पाणी परत त्यांच्यावर आणले; परंतु इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या वाटेवरून चालले.

  4. तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या.

  5. मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”

  6. याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर एवढे घ्यावे.’ ”

  7. इस्राएली लोकांनी जसे त्यांना सांगितले होते तसे केले; काहींनी अधिक तर काहींनी थोडे गोळा केले.

  8. आणि जेव्हा त्यांनी ते ओमेरच्या मापाने मोजले, ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही. प्रत्येकाने त्यांना जितके लागत होते तितकेच गोळा केले होते.

  9. मग मोशे त्यांना म्हणाला, “यातील काहीही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये,”

  10. तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.

  11. मग रोज सकाळी प्रत्येकाला लागते तेवढेच ते गोळा करीत असत आणि जेव्हा सूर्य प्रखर होई, तेव्हा ते वितळून जात असे.

  12. आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला.

  13. मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”

  14. म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले.

  15. मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही.

  16. सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”

  17. पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही.

  18. मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार?

  19. हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”

  20. म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.

  21. इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्ना असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती.

  22. मोशे यहोशुआला म्हणाला, “आपल्यातून काही माणसे निवड आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी युद्ध करा. उद्या मी परमेश्वराची काठी माझ्या हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन.”

  23. मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले.

  24. जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे.

  25. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.