Skip to content

Jerusalem बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 117 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्‍याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,

  2. त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.

  3. ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्‍यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले.

  4. स्तुतिगान करणारे दुसरे गायकवृंद विरुद्ध दिशेने पुढे निघाले. मी वरच्या बाजूने त्यांच्यात सामील होण्यास दुसऱ्या अर्ध्या लोकांबरोबर निघालो—आम्ही भट्टीबुरुजापासून रुंद तटापर्यंत चालत गेलो.

  5. नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.

  6. नंतर धन्यवाद देणारे दोन्ही गायकवृंद परमेश्वराच्या भवनात जाऊन त्यांनी आणि अर्ध्या अधिकाऱ्यांसह मी देखील आपले नेमलेले स्थान ग्रहण केले.

  7. तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्‍याह, आणि हनन्याह.

  8. व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.

  9. या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.

  10. यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे, जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी.

  11. हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत.

  12. इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे.

  13. यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

  14. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे.

  15. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  16. हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

  17. तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते.

  18. यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.

  19. जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.

  20. जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’

  21. जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा, आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’

  22. कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’

  23. “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

  24. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  25. हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.