मुख्य मजकुरावर जा

Jerusalem बद्दल बायबलमधील वचने: Wickedness of

9 वचने · 117 पैलू

"Jerusalem" साठी शोधा

Wickedness of बद्दल वचने

  1. यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

  2. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे.

  3. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  4. हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

  5. “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

  6. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  7. हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.

  8. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

  9. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.