मुख्य मजकुरावर जा

Jerusalem बद्दल बायबलमधील वचने: Wickedness of, the cause of its calamities

8 वचने · 117 पैलू

Wickedness of, the cause of its calamities बद्दल वचने

  1. म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील.

  2. मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन.

  3. मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील;

  4. त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.”

  5. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली.

  6. तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.

  7. “यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.

  8. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.