Jerusalem बद्दल बायबलमधील वचने: Final restoration of
Final restoration of बद्दल वचने
परंतु यहूदाह सदासर्वकाळ आणि यरुशलेम पिढ्यान् पिढ्या वसलेले राहील.
त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय? नाही, मुळीच नाही.”
मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”
आणि पाहा, जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो जाऊ लागला, तेव्हा दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटण्यास आला.
व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील.
आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.