मुख्य मजकुरावर जा

Holiness बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा.

  2. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.

  3. तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्‍याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे.

  4. यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.

  5. एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

  6. आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.

  7. ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.

  8. परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे.

  9. आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे.

  10. सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.

  11. परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत.

  12. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

  13. विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.

  14. भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील.

  15. आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत.

  16. म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल.

  17. तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग.

  18. दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये;

  19. आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्‍या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी.

  20. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.

  21. परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.

  22. आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका.

  23. परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा.

  24. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”

  25. प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा.