Skip to content

Holiness बद्दल बायबलमधील वचने: General references

147 वचने · 51 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,

  2. “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,

  3. यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल.

  4. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.

  5. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.

  6. यामुळे इस्राएल त्यांच्या शत्रूपुढे उभे राहू शकत नाहीत; ते पाठ फिरवून पळून जात आहेत, कारण त्यांच्या नाशासाठी तेच जबाबदार आहेत. तुमच्यामधून नाशासाठी समर्पित असलेल्या वस्तूंचा तुम्ही नाश करेपर्यंत मी तुम्हाबरोबर असणार नाही.

  7. “तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग, तुमच्यापैकी प्रत्येकाने उद्यासाठी स्वतःला शुद्ध करून घ्या, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: अहो इस्राएली लोकहो, तुमच्यामध्ये समर्पित केलेल्या वस्तू आहेत. त्या वस्तू काढून टाकेपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूपुढे उभे राहू शकणार नाही.

  8. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  9. ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;

  10. जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;

  11. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

  12. जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

  13. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

  14. ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

  15. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

  16. ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत.

  17. जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत.

  18. ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात.

  19. होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.

  20. रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो; सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात, तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.

  21. राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल, आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील. जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”

  22. मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.

  23. जशी माती अंकुराला उगविते आणि बाग बीज वाढविते तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.

  24. त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील.

  25. यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी नसतील.