मुख्य मजकुरावर जा

Holiness बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,

  2. सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.

  3. जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे.

  4. जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.

  5. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  6. आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

  7. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे.

  8. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.

  9. पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर,

  10. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात;

  11. फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात;

  12. तुमची मनोवृत्ती नवी केली जावी;

  13. आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.

  14. कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.

  15. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)

  16. प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या.

  17. अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.

  18. पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले,

  19. जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;

  20. आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी.

  21. कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,

  22. येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.

  23. म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे.

  24. यामुळे परमेश्वराचा क्रोध येणार आहे.

  25. पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता.