Skip to content

Death बद्दल बायबलमधील वचने

177 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ.

  2. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.

  3. कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे.

  4. जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”

  5. “अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”

  6. कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.

  7. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.

  8. खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.

  9. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.

  10. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.

  11. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!

  12. मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे!

  13. परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.

  14. बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये.

  15. कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.

  16. क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.

  17. ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.

  18. कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे.

  19. मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

  20. पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.

  21. आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.

  22. मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्‍यांची त्यांना सुटका करता येईल.

  23. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.

  24. जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.

  25. मग मृत झालेले लहान थोर परमेश्वराच्या आसनासमोर उभे असलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. आणखी एक पुस्तक उघडण्यात आले जे जीवनाचे पुस्तक होते. पुस्तकात लिहिल्यानुसार प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.