Death बद्दल बायबलमधील वचने: Of the wicked
Of the wicked बद्दल वचने
“पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत,
की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.
“तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?
ते कितीदा वार्यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?
एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो, जो सुरक्षित आणि सुखी असतो,
जो शरीराने सुदृढ, आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे.
आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो, ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो.
तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात, आणि दोघेही किड्यांनी झाकले जातात.
धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.
संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.
पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.
तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल.
टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.”
दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.
कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील.
दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत.
मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.
परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही.
जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे आणि कबरेचा अनुभव त्यांना येऊ नये.
सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते; मूर्ख व अज्ञानी माणसेही मरण पावतात, ते आपली संपत्ती दुसर्यांसाठी ठेवून जातात.
तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही.
समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली, तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे.
कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.
होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.