- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Civil Service बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही.
त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले.
ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.
तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.
राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता.
तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले.
मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?”
म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास,
राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा.
आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”
राजाने हामानाला फर्माविले, “आता त्वरा कर आणि माझा पोशाख आणि माझा घोडा घे आणि तू सांगितलेस अगदी त्याप्रमाणे राजद्वारी बसणारा यहूदी मर्दखयाच्या बाबतीत कर. तू सुचवलेल्या कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नको.”
मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.”
मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला—
शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी.
राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे.
परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.
राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले.
राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.
बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले.
आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता.
मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले.
येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्याला डावीकडे बसू द्यावे.”
यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!”
“त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.”
“पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली.