Skip to content

Chiding बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

  2. कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”

  3. तेव्हा फारोहने अब्रामाला बोलाविले आणि म्हटले, “तू माझ्याशी हे काय केले आहेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस?

  4. ‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!”

  5. मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”

  6. मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”

  7. अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाकाने उत्तर दिले, “तिच्यामुळे माझा कोणी वध करेल अशी मला भीती वाटली.”

  8. अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.”

  9. लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस?

  10. असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती?

  11. माझ्या नातवंडाचा निरोप घेण्यापूर्वी, तू मला त्यांची चुंबने देखील घेऊ दिली नाहीस. ही मूर्खपणाची वागणूक आहे.

  12. मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’

  13. आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?”

  14. याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल.

  15. पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.

  16. लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला.

  17. आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत.

  18. राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही.

  19. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात?

  20. माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या.

  21. “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही.

  22. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.

  23. माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे.

  24. अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला.

  25. जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.”