Skip to content

Chiding बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 11 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.

  2. गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.

  3. जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.

  4. “राजे आले, ते लढले, कनानाचे राजे लढले, मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.

  5. आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.

  6. किशोन नदीने त्यांना वाहून नेले, पुरातन नदी, किशोन नदी. कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा!

  7. घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले!

  8. याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या. त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या, कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत, पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’

  9. नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.

  10. त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.”

  11. योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते.

  12. नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.

  13. नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत.

  14. तुमचा द्वेष करणार्‍यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता.

  15. तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”