Chiding बद्दल बायबलमधील वचने: David chides Joab for slaying Abner
David chides Joab for slaying Abner बद्दल वचने
नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.
त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.”
योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते.
नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.