Skip to content

Bigotry बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  2. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.”

  3. “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.”

  4. आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.

  5. नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.

  6. पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे.

  7. परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,

  8. कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत,

  9. आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले?

  10. अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही.

  11. शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”

  12. आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे.

  13. जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्‍या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो.

  14. दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा:

  15. “धन्य ते लोक, ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे.

  16. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”

  17. हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला.

  18. कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी!

  19. सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे,

  20. आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहामामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे.

  21. अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते

  22. कारण जे नियमावर अवलंबून आहेत ते जर वारसदार आहेत, तर विश्वासास काहीच किंमत नाही आणि अभिवचने निरर्थक आहेत.

  23. कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही.

  24. यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.

  25. हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते,