मुख्य मजकुरावर जा

Assyria बद्दल बायबलमधील वचने

204 वचने · 59 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ”

  2. दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!

  3. त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.

  4. त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.

  5. त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.

  6. एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”

  7. त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.

  8. ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील.

  9. त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.

  10. त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.

  11. आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.

  12. त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.

  13. शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल.

  14. एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.

  15. कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”

  16. याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले:

  17. “कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

  18. म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील,

  19. हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.”

  20. युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!

  21. तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.

  22. “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!

  23. मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.

  24. परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.

  25. ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.