मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने

104 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?

  2. “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.

  3. याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.

  4. लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.

  5. उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  6. माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.

  7. ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.

  8. त्यांना आपला दोष वाहून घ्यावा लागेल; त्या संदेष्टाकडून सल्ला घेणारा जितका दोषी असणार, संदेष्टा सुद्धा तितकाच दोषी असेल.

  9. तेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून आणखी बहकून जाणार नाहीत किंवा ते स्वतःला आपल्या सर्व पापांनी आणखी विटाळविणार नाहीत. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  10. म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.

  11. ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’

  12. कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.

  13. ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”

  14. मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.

  15. “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.

  16. ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका.

  17. हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”

  18. पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.

  19. रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  20. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.

  21. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे.

  22. मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  23. “मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’

  24. येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले,

  25. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?”