मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने

104 वचने · 23 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.

  2. ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल.

  3. परंतु चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही सहन केली तर त्यात काय मोठेपणा आहे? परंतु जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख भोगले आणि ते सहन केले तर हे परमेश्वराच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे.

  4. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.