मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने: In leading us to seek God in prayer

8 वचने · 23 पैलू

In leading us to seek God in prayer बद्दल वचने

  1. त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.

  2. “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.

  3. याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.

  4. लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.

  5. उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  6. कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.

  7. ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”

  8. मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.