मुख्य मजकुरावर जा

Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने: In trying our faith and obedience

10 वचने · 23 पैलू

In trying our faith and obedience बद्दल वचने

  1. काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.

  2. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

  3. मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.)

  4. “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

  5. तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या.

  6. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला रानात चाळीस वर्षात कसे चालविले, त्यांनी तुम्हाला कसे नम्र केले व तुमची परीक्षा कशी पाहिली, याची तुम्ही आठवण करा. तुमच्या अंतःकरणात काय होते, तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळणार की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी असे केले.

  7. त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे.

  8. परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्याला वारसाचे वचन प्राप्त झाले होते तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला;

  9. ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल.

  10. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.