Afflictions Made Beneficial बद्दल बायबलमधील वचने: In purifying us
In purifying us बद्दल वचने
मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.
विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.
मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन; मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन.
मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.”
पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली.
तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.
म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?
हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”
पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.
रुपे शुद्ध करणार्यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,