circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ६:६३सुमारे इ.स. ३२
फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
- योहान ६:६४सुमारे इ.स. ३२
तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते.
- योहान ६:६५सुमारे इ.स. ३२
पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.”
- योहान ६:६६सुमारे इ.स. ३२
हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत.
- योहान ६:६७सुमारे इ.स. ३२
येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?”
- योहान ६:६८सुमारे इ.स. ३२
त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.
- योहान ६:६९सुमारे इ.स. ३२
आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”
- योहान ६:७०सुमारे इ.स. ३२
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!”
- योहान ६:७१सुमारे इ.स. ३२
हे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता.
- योहान ७:१सुमारे इ.स. ३३
यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती, कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते.
- योहान ७:२सुमारे इ.स. ३३
परंतु जेव्हा यहूदीयांच्या मंडपाचा सण जवळ आला,
- योहान ७:३सुमारे इ.स. ३३
येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल.
- योहान ७:४सुमारे इ.स. ३३
ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा.”
- योहान ७:५सुमारे इ.स. ३३
कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.
- योहान ७:६सुमारे इ.स. ३३
यावर येशूंनी त्यांना म्हटले, “माझी वेळ अद्यापि आलेली नाही; तुम्हाला कोणतीही वेळ योग्यच आहे.
- योहान ७:७सुमारे इ.स. ३३
जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो.
- योहान ७:८सुमारे इ.स. ३३
तुम्ही सणास जा. मी या सणास वर जात नाही कारण माझी वेळ अजून आली नाही.”
- योहान ७:९सुमारे इ.स. ३३
त्यांना असे सांगितल्यावर, ते गालीलातच राहिले.
- योहान ७:१०सुमारे इ.स. ३३
तथापि, असे असूनही, येशूंचे भाऊ सणासाठी गेल्यानंतर, येशूही, उघडपणे नव्हे, तर गुप्तपणे तिथे गेले.
- योहान ७:११सुमारे इ.स. ३३
आता सणात यहूदी पुढारी येशूंवर नजर ठेवून विचारपूस करीत होते, “की ते कुठे आहेत?”
- योहान ७:१२सुमारे इ.स. ३३
समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला मनुष्य आहे.” तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.”
- योहान ७:१३सुमारे इ.स. ३३
परंतु यहूदी पुढार्यांच्या भीतीमुळे लोकांसमोर त्यांच्याविषयी बोलण्यास कोणीच धजत नव्हते.
- योहान ७:१४सुमारे इ.स. ३३
मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले.
- योहान ७:१५सुमारे इ.स. ३३
जे यहूदी तिथे होते ते चकित झाले आणि विचारू लागले, “हा मनुष्य शिकला नसून हे ज्ञान त्याला कसे प्राप्त झाले?”
- योहान ७:१६सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे.