circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ७:१७सुमारे इ.स. ३३
जर कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निर्धार करेल तर त्याला खात्रीने समजेल की माझी शिकवण परमेश्वरापासून आहे की मी स्वतःच्या मनाचे बोलत आहे.
- योहान ७:१८सुमारे इ.स. ३३
जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.
- योहान ७:१९सुमारे इ.स. ३३
मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले आहे ना? तरी तुम्हापैकी एकही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारण्याचा प्रयत्न का करता?”
- योहान ७:२०सुमारे इ.स. ३३
त्यावर लोकसमुदायाने उत्तर दिले, “तू भूतग्रस्त आहेस. तुला जिवे मारण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?”
- योहान ७:२१सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले.
- योहान ७:२२सुमारे इ.स. ३३
मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता.
- योहान ७:२३सुमारे इ.स. ३३
मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता?
- योहान ७:२४सुमारे इ.स. ३३
तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.”
- योहान ७:२५सुमारे इ.स. ३३
यरुशलेममध्ये राहणारे काही लोक एकमेकास विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय?
- योहान ७:२६सुमारे इ.स. ३३
हा तर येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्यांना खात्री पटली आहे का?
- योहान ७:२७सुमारे इ.स. ३३
परंतु हा मनुष्य कुठून आला आहे हे आपणास माहीत आहे; जेव्हा ख्रिस्त येईल, तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाही कळणार नाही.”
- योहान ७:२८सुमारे इ.स. ३३
हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कुठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही,
- योहान ७:२९सुमारे इ.स. ३३
पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.”
- योहान ७:३०सुमारे इ.स. ३३
त्यांनी येशूंना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांच्यावर हात टाकू शकले नाही, कारण त्यांची वेळ अद्यापि आली नव्हती.
- योहान ७:३१सुमारे इ.स. ३३
तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसिहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करेल काय?”
- योहान ७:३२सुमारे इ.स. ३३
जेव्हा परूश्यांनी लोकांची त्यांच्याबद्दल चाललेली कुजबुज ऐकली. तेव्हा त्यांनी आणि महायाजकांनी येशूंना अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.
- योहान ७:३३सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना म्हणाले, “मी तुमच्याजवळ आणखी थोडा वेळ राहणार आहे, मग ज्याने मला पाठविले, त्यांच्याकडे परत जाईन.
- योहान ७:३४सुमारे इ.स. ३३
तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही.”
- योहान ७:३५सुमारे इ.स. ३३
यहूदी पुढारी एकमेकास विचारू लागले, “या मनुष्याचा कुठे जाण्याचा विचार आहे की तो आपणास सापडणार नाही? कदाचित हा आपले लोक जे ग्रीक लोकांमध्ये पांगलेले आहेत, त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी जात असेल काय?
- योहान ७:३६सुमारे इ.स. ३३
‘तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ असे तो बोलला याचा अर्थ तरी काय असावा?”
- योहान ७:३७सुमारे इ.स. ३३
मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तहानलेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे.
- योहान ७:३८सुमारे इ.स. ३३
शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
- योहान ७:३९सुमारे इ.स. ३३
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.
- योहान ७:४०सुमारे इ.स. ३३
त्यांचे हे शब्द ऐकल्यावर, त्यांच्यातील काहीजण म्हणाले, “खरोखर हा मनुष्य संदेष्टा आहे.”
- योहान ७:४१सुमारे इ.स. ३३
इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.” पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय?