circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ६:३८सुमारे इ.स. ३२
कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे.
- योहान ६:३९सुमारे इ.स. ३२
आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे.
- योहान ६:४०सुमारे इ.स. ३२
कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”
- योहान ६:४१सुमारे इ.स. ३२
मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.
- योहान ६:४२सुमारे इ.स. ३२
ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?”
- योहान ६:४३सुमारे इ.स. ३२
हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका,
- योहान ६:४४सुमारे इ.स. ३२
ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
- योहान ६:४५सुमारे इ.स. ३२
संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो.
- योहान ६:४६सुमारे इ.स. ३२
जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही.
- योहान ६:४७सुमारे इ.स. ३२
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे.
- योहान ६:४८सुमारे इ.स. ३२
मीच जीवनाची भाकर आहे.
- योहान ६:४९सुमारे इ.स. ३२
तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले.
- योहान ६:५०सुमारे इ.स. ३२
परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही.
- योहान ६:५१सुमारे इ.स. ३२
मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”
- योहान ६:५२सुमारे इ.स. ३२
यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?”
- योहान ६:५३सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही.
- योहान ६:५४सुमारे इ.स. ३२
जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
- योहान ६:५५सुमारे इ.स. ३२
कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.
- योहान ६:५६सुमारे इ.स. ३२
जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.
- योहान ६:५७सुमारे इ.स. ३२
मला पाठविणार्या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल.
- योहान ६:५८सुमारे इ.स. ३२
मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”
- योहान ६:५९सुमारे इ.स. ३२
येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.
- योहान ६:६०सुमारे इ.स. ३२
हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?”
- योहान ६:६१सुमारे इ.स. ३२
त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?
- योहान ६:६२सुमारे इ.स. ३२
तर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल!