circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ६:१३सुमारे इ.स. ३२
मग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या.
- योहान ६:१४सुमारे इ.स. ३२
येशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.”
- योहान ६:१५सुमारे इ.स. ३२
लोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले.
- योहान ६:१६सुमारे इ.स. ३२
संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले,
- योहान ६:१७सुमारे इ.स. ३२
ते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते.
- योहान ६:१८सुमारे इ.स. ३२
परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या.
- योहान ६:१९सुमारे इ.स. ३२
ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले.
- योहान ६:२०सुमारे इ.स. ३२
परंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.”
- योहान ६:२१सुमारे इ.स. ३२
ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्यास पोहोचली.
- योहान ६:२२सुमारे इ.स. ३२
मग दुसर्या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते.
- योहान ६:२३सुमारे इ.स. ३२
काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या.
- योहान ६:२४सुमारे इ.स. ३२
समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
- योहान ६:२५सुमारे इ.स. ३२
ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?”
- योहान ६:२६सुमारे इ.स. ३२
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात.
- योहान ६:२७सुमारे इ.स. ३२
नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”
- योहान ६:२८सुमारे इ.स. ३२
त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?”
- योहान ६:२९सुमारे इ.स. ३२
येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
- योहान ६:३०सुमारे इ.स. ३२
त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल?
- योहान ६:३१सुमारे इ.स. ३२
आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”
- योहान ६:३२सुमारे इ.स. ३२
येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.
- योहान ६:३३सुमारे इ.स. ३२
ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
- योहान ६:३४सुमारे इ.स. ३२
ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
- योहान ६:३५सुमारे इ.स. ३२
त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
- योहान ६:३६सुमारे इ.स. ३२
परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
- योहान ६:३७सुमारे इ.स. ३२
जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही.