मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान ५:३५सुमारे इ.स. ३१

    योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले.

  2. योहान ५:३६सुमारे इ.स. ३१

    “माझी जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा वजनदार आहे. कारण जी कामे पूर्ण करण्याचे मला पित्याने सोपविले आहे, तीच कार्ये मी करीत आहे व ती साक्ष देतात की पित्यांनीच मला पाठविले आहे.

  3. योहान ५:३७सुमारे इ.स. ३१

    ज्या पित्याने मला पाठविले त्यांनी स्वतःच माझ्याबद्दल साक्ष दिली आहे. तुम्ही त्यांची वाणी कधीही ऐकली नाही आणि त्यांची आकृती पाहिली नाही,

  4. योहान ५:३८सुमारे इ.स. ३१

    त्यांचे वचन तुम्हामध्ये राहत नाही, कारण ज्याला त्यांनी पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही.

  5. योहान ५:३९सुमारे इ.स. ३१

    तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;

  6. योहान ५:४०सुमारे इ.स. ३१

    तरी जीवनप्राप्ती साठी तुम्ही माझ्याकडे येत नाही.

  7. योहान ५:४१सुमारे इ.स. ३१

    “मी मनुष्याचे गौरव स्वीकारीत नाही,

  8. योहान ५:४२सुमारे इ.स. ३१

    परंतु मी तुम्हाला ओळखतो व मला चांगले माहीत आहे की तुमच्या हृदयात परमेश्वराची प्रीती नाही.

  9. योहान ५:४३सुमारे इ.स. ३१

    कारण मी पित्याच्या नावाने आलो, पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही; परंतु जर स्वतःच्याच नावाने दुसरा कोणी आला, तर तुम्ही त्याला स्वीकाराल.

  10. योहान ५:४४सुमारे इ.स. ३१

    जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?

  11. योहान ५:४५सुमारे इ.स. ३१

    “परंतु मी पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवेन असा विचार करू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशेच तुम्हाला दोषी ठरवेल.

  12. योहान ५:४६सुमारे इ.स. ३१

    तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला, तर माझ्यावरही ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे.

  13. योहान ५:४७सुमारे इ.स. ३१

    परंतु ज्याअर्थी तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवीत नाही, त्याअर्थी मी जे सांगतो त्यावर विश्वास कसा ठेवाल?”

  14. योहान ६:१सुमारे इ.स. ३२

    काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्‍यास सरोवर) असेही म्हणत

  15. योहान ६:२सुमारे इ.स. ३२

    लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्‍यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते.

  16. योहान ६:३सुमारे इ.स. ३२

    यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले.

  17. योहान ६:४सुमारे इ.स. ३२

    यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता.

  18. योहान ६:५सुमारे इ.स. ३२

    जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?”

  19. योहान ६:६सुमारे इ.स. ३२

    ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.

  20. योहान ६:७सुमारे इ.स. ३२

    फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक तरी लागेल!”

  21. योहान ६:८सुमारे इ.स. ३२

    मग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला,

  22. योहान ६:९सुमारे इ.स. ३२

    “येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?”

  23. योहान ६:१०सुमारे इ.स. ३२

    येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती.

  24. योहान ६:११सुमारे इ.स. ३२

    मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.

  25. योहान ६:१२सुमारे इ.स. ३२

    सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”