circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ७:४२सुमारे इ.स. ३३
शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?”
- योहान ७:४३सुमारे इ.स. ३३
अशा रीतीने लोकसमुदायात येशूंमुळे फूट पडली.
- योहान ७:४४सुमारे इ.स. ३३
काहींना त्यांना पकडावेसे वाटले, परंतु कोणीही त्यांच्यावर हात टाकला नाही.
- योहान ७:४५सुमारे इ.स. ३३
शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?”
- योहान ७:४६सुमारे इ.स. ३३
शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.”
- योहान ७:४७सुमारे इ.स. ३३
त्यावर उलट उत्तर देत परूशी म्हणाले, “तुम्हालाही त्याने फसविले आहे काय?”
- योहान ७:४८सुमारे इ.स. ३३
अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
- योहान ७:४९सुमारे इ.स. ३३
नाही! परंतु हा समुदाय ज्यांना नियमशास्त्राविषयी माहिती नाही—तो शापित आहे.
- योहान ७:५०सुमारे इ.स. ३३
निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला,
- योहान ७:५१सुमारे इ.स. ३३
“एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?”
- योहान ७:५२सुमारे इ.स. ३३
त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.”
- योहान ७:५३सुमारे इ.स. ३३
नंतर ते सर्वजण घरी गेले.
- योहान ८:१सुमारे इ.स. ३३
नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले.
- योहान ८:२सुमारे इ.स. ३३
अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले.
- योहान ८:३सुमारे इ.स. ३३
नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले
- योहान ८:४सुमारे इ.स. ३३
आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे.
- योहान ८:५सुमारे इ.स. ३३
मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?”
- योहान ८:६सुमारे इ.स. ३३
ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते. परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले.
- योहान ८:७सुमारे इ.स. ३३
ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.”
- योहान ८:८सुमारे इ.स. ३३
मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले.
- योहान ८:९सुमारे इ.स. ३३
ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती.
- योहान ८:१०सुमारे इ.स. ३३
मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?”
- योहान ८:११सुमारे इ.स. ३३
ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.”
- योहान ८:१२सुमारे इ.स. ३३
येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
- योहान ८:१३सुमारे इ.स. ३३
यावर परूशी त्यांना आव्हान देत म्हणाले, “येथे आपण, आपल्या स्वतःविषयी साक्ष देता; म्हणून तुमची साक्ष सबळ वाटत नाही.”