- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Creation Era
The Great Flood
Humanity's wickedness fills the earth; God preserves Noah and his family through a catastrophic flood.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ७:४सुमारे इ.स.पू. २३४८
आजपासून बरोबर सात दिवसानंतर मी पृथ्वीवर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पाडेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून नष्ट करून टाकेन.”
- उत्पत्ती ७:५सुमारे इ.स.पू. २३४८
याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले.
- उत्पत्ती ७:६सुमारे इ.स.पू. २३४८
जलप्रलय आला, तेव्हा नोआह सहाशे वर्षांचा होता.
- उत्पत्ती ७:७सुमारे इ.स.पू. २३४८
जलप्रलयापासून वाचण्यासाठी नोआह आणि त्याचे पुत्र आणि त्याची पत्नी, व पुत्रांच्या पत्नी यांनी तारवात प्रवेश केला.
- उत्पत्ती ७:८सुमारे इ.स.पू. २३४८
तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते.
- उत्पत्ती ७:९सुमारे इ.स.पू. २३४८
परमेश्वराने नोआहला आज्ञा दिल्याप्रमाणे ते सर्व प्राणी नर व मादी अशा जोडीने तारवात आले.
- उत्पत्ती ७:१०सुमारे इ.स.पू. २३४८
आणि सात दिवसानंतर पृथ्वीवर जलप्रलय आला.
- उत्पत्ती ७:११सुमारे इ.स.पू. २३४८
नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली.
- उत्पत्ती ७:१२सुमारे इ.स.पू. २३४८
आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला.
- उत्पत्ती ७:१३सुमारे इ.स.पू. २३४८
त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले.
- उत्पत्ती ७:१४सुमारे इ.स.पू. २३४८
त्यांच्याबरोबर प्रत्येक वन्यजातीचे प्राणी, सर्वप्रकारचे पाळीव पशू, जमिनीवर सरपटणारे प्राणी आणि प्रत्येक जातीचे, पंख असलेले सर्व पक्षी तारवात गेले.
- उत्पत्ती ७:१५सुमारे इ.स.पू. २३४८
ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकएक जोडी नोआहकडे आली आणि त्यांनी नोआहसोबत तारूत प्रवेश केला.
- उत्पत्ती ७:१६सुमारे इ.स.पू. २३४८
नर व मादी असे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जोडीजोडीने आले. मग याहवेहने त्यांना आत ठेवून तारवाचे दार बंद केले.
- उत्पत्ती ७:१७सुमारे इ.स.पू. २३४८
जलप्रलय चाळीस दिवस चालू होता. यामुळे सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली आणि तारू पृथ्वीच्यावर पाण्यात तरंगू लागले.
- उत्पत्ती ७:१८सुमारे इ.स.पू. २३४८
पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले.
- उत्पत्ती ७:१९सुमारे इ.स.पू. २३४८
शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले.
- उत्पत्ती ७:२०सुमारे इ.स.पू. २३४८
पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले.
- उत्पत्ती ७:२१सुमारे इ.स.पू. २३४८
पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता.
- उत्पत्ती ७:२२सुमारे इ.स.पू. २३४८
कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला.
- उत्पत्ती ७:२३सुमारे इ.स.पू. २३४८
पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.
- उत्पत्ती ७:२४सुमारे इ.स.पू. २३४८
पृथ्वी पाण्याच्या पुराखाली दीडशे दिवस राहिली.
परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले.
पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला.
पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले.
आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले.