मुख्य मजकुरावर जा

Creation Era

The Great Flood

Humanity's wickedness fills the earth; God preserves Noah and his family through a catastrophic flood.

97 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली.

  2. आणखी चाळीस दिवसानंतर नोआहने तारवात बनविलेली खिडकी उघडली

  3. आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता.

  4. दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले.

  5. परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले.

  6. आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले.

  7. संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे.

  8. मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही.

  9. उत्पत्ती ८:१३सुमारे इ.स.पू. २३४७

    नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले.

  10. उत्पत्ती ८:१४सुमारे इ.स.पू. २३४७

    दुसर्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली.

  11. उत्पत्ती ८:१५सुमारे इ.स.पू. २३४७

    मग परमेश्वराने नोआहला सांगितले,

  12. उत्पत्ती ८:१६सुमारे इ.स.पू. २३४७

    “तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे.

  13. उत्पत्ती ८:१७सुमारे इ.स.पू. २३४७

    प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”

  14. उत्पत्ती ८:१८सुमारे इ.स.पू. २३४७

    मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले.

  15. उत्पत्ती ८:१९सुमारे इ.स.पू. २३४७

    यांच्याबरोबर पशू, सरपटणारे प्राणी व पक्षी—भूमीवर वावरणारे सर्वप्रकारचे प्राणी तारवातून उतरले.

  16. उत्पत्ती ८:२०सुमारे इ.स.पू. २३४७

    मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले.

  17. उत्पत्ती ८:२१सुमारे इ.स.पू. २३४७

    तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही.

  18. उत्पत्ती ८:२२सुमारे इ.स.पू. २३४७

    “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  19. परमेश्वराने नोआहला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन सांगितले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.

  20. पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे;

  21. जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.

  22. “परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस

  23. आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्‍या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.

  24. “जो कोणी मनुष्याचे रक्त वाहील, मनुष्याद्वारेच त्याचा रक्तपात करण्यात येईल; कारण परमेश्वराने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केले आहे.

  25. तुम्ही तर फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका आणि तिच्यावर संपन्न व्हा.”