मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.

  3. यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”

  4. मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”

  5. मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्‍यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”

  6. मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली.

  7. मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले.

  8. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.”

  9. यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.

  10. मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”

  11. पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय?

  12. मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्‍यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”

  13. मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली,

  14. व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही.

  15. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.”

  16. नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी.

  17. तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली.

  18. मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती.

  19. पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.

  20. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.

  21. मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.”

  22. जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

  23. मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो.

  24. मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे.

  25. मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.