मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशे व अहरोन यांनी इस्राएलांच्या सर्व वडिलांना एकत्र बोलाविले,

  2. आणि याहवेहने मोशेला जे सांगितले होते ते सर्वकाही अहरोनाने त्यांना सांगितले. मोशेने लोकांच्या देखत चिन्हे करून दाखविली.

  3. नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”

  4. यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!”

  5. फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले,

  6. मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का?

  7. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”

  8. परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे.

  9. तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही.

  10. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले,

  11. परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”

  12. आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.

  13. अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले.

  14. ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.”

  15. हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.

  16. जेव्हा मोशे इजिप्तमध्ये होता तेव्हा याहवेह त्याच्याशी बोलले,

  17. याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”

  18. परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?”

  19. मग याहवेह मोशेला म्हणाले, “पाहा, मी तुला फारोहसाठी परमेश्वरासारखे केले आहे आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा असेल.

  20. मग मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले.

  21. जेव्हा ते फारोहपुढे जाऊन बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.

  22. मग याहवेह मोशे व अहरोन यास म्हणाले,

  23. मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला.

  24. तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो.

  25. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”