मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे

  3. मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील.

  4. मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.”

  5. मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.”

  6. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.”

  7. तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले.

  8. मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  9. नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.”

  10. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला.

  11. तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.”

  12. परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे.

  13. “तू म्हणालास तसेच होईल,” मोशे म्हणाला. “मी पुन्हा तुझ्यासमोर उभा राहणार नाही.”

  14. मग याहवेह मोशेला म्हणाले, “मी फारोह व इजिप्तवर आणखी एक पीडा आणेन. त्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणाहून जाऊ देईल आणि जेव्हा तो हे करेल तेव्हा तो तुम्हाला अक्षरशः देशातून घालवून देईल.

  15. (आता याहवेहने इजिप्तमधील लोकांची मने इस्राएलांना अनुकूल होतील असे केले, मोशे स्वतः इजिप्तमध्ये फारोहच्या सेवकांच्या व इजिप्तच्या लोकांच्या दृष्टीत फार थोर झाला होता.)

  16. मग मोशे म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मध्यरात्रीच्या सुमारास मी इजिप्तमधून फिरेन.

  17. याहवेहने मोशेला आधीच सांगितले होते, “इजिप्त देशात मी पुष्कळ चमत्कार करावे म्हणून फारोह तुमचे ऐकण्यास नाकारेल.”

  18. मोशे व अहरोन यांनी फारोहसमक्ष हे सर्व चमत्कार केले, पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली नाही.

  19. मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले,

  20. मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा.

  21. मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

  22. तेव्हा फारोहने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, “उठा! तुम्ही व इस्राएली लोक माझ्या लोकांना सोडून जा! जा, आणि तुम्ही मागितल्याप्रमाणे याहवेहची उपासना करा.

  23. मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले.

  24. नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “वल्हांडणाच्या भोजनाचे हे नियम आहेत: “कोणत्याही विदेशी व्यक्तीने ते खाऊ नये.

  25. तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.