मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण ते भरगर्दीतून चालतच त्यांच्या मार्गाने निघून गेले.

  2. येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता.

  3. “नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”

  4. “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” मग त्या भुताने त्या मनुष्याला सर्वांसमोर खाली पाडले आणि त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून गेला.

  5. सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे! काय हा अधिकार आणि त्यांच्या शक्तीने ते अशुद्ध आत्म्यांना आदेश देतात व ते बाहेर येतात!”

  6. त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली.

  7. येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले.

  8. त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.

  9. सूर्यास्ताच्या वेळी, लोकांनी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते त्या सर्वांना येशूंकडे आणले आणि त्यांनी त्या प्रत्येकावर हात ठेऊन त्यांना बरे केले.

  10. याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते.

  11. पहाटेच, येशू एकांतस्थळी गेले. लोक त्यांना शोधीत जिथे ते होते तिथे गेले. तेव्हा येशू त्यांना सोडून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.

  12. पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्‍या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”

  13. आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले.

  14. एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.

  15. त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.

  16. येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”

  17. शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.”

  18. शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!”

  19. आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते. येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.”

  20. त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.

  21. येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”

  22. येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्काळ त्याचा कुष्ठरोग निघून गेला.

  23. नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”

  24. तरीपण येशूंविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले, त्यामुळे त्यांचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी लोकसमुदाय येऊ लागले.

  25. परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत.