मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते.

  2. काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.

  3. जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले.

  4. जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते म्हणाले, “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

  5. ते काय विचार करीत होते हे येशूंनी ओळखले आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये या गोष्टींचा विचार का करता?

  6. तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”

  7. नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.”

  8. तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला.

  9. नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते.

  10. तरी त्या पंथाचे परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी शिष्यांजवळ तक्रार केली, “तुम्ही जकातदार व पापी लोकांबरोबर खाणे व पिणे का करता?”

  11. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.

  12. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनास पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.”

  13. ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.”

  14. यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर वर असताना उपवास कसे करतील?

  15. नंतर येशूंनी त्यांना एक दाखला सांगितला: ते म्हणाले, “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.

  16. एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य गव्हाची काही कणसे तोडून हातांवर चोळून दाणे खाऊ लागले.

  17. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  18. मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

  19. दुसर्‍या एका शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये ते शिक्षण देत असताना, उजवा हात वाळून गेलेला असा एक मनुष्य तिथे उपस्थित होता.

  20. नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी लोक, त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण शोधत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात की काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते.

  21. परंतु येशूंना माहीत होते की ते काय विचार करीत आहेत, तेव्हा त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा.” तेव्हा तो उठला आणि तिथे उभा राहिला.

  22. नंतर येशू म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, एखाद्याचा जीव वाचवणे किंवा त्याचा नाश करणे?”

  23. त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

  24. परंतु परूश्यांना व नियमशास्त्र शिक्षकांना क्रोध आला आणि येशूंना जिवे कसे मारता येईल याची त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा सुरू केली.

  25. त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.