Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
दिवस उगवताच त्यांनी आपल्या शिष्यांना स्वतःकडे बोलाविले आणि त्यांच्यापैकी बारा जणांना निवडले, ज्यांना त्यांनी प्रेषित पद प्रदान केले:
शिमोन, ज्याला पेत्र असे नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
ते खाली आले आणि एका सपाट मैदानावर उभे राहिले. त्यांच्याभोवती शिष्यांचा मोठा समुदाय आणि यरुशलेम, यहूदीया आणि सोर व सीदोन व उत्तरेकडील समुद्रकिनार्यांच्या नगरातूनही आलेले अनेक लोक होते.
प्रत्येकजण त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, कारण त्यांच्यामधून सामर्थ्य बाहेर निघून ते बरे होत.
नंतर आपल्या शिष्यांना पाहून म्हणाले: “जे दीन आहेत ते तुम्ही धन्य, कारण परमेश्वराचे राज्य तुमचे आहे.
मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.
“पण तुम्ही जे माझे ऐकत आहात, त्यांना मी सांगतोः तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे भले करा.
तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.
येशूंनी त्यांना हा दाखलासुद्धा सांगितला: “आंधळा मनुष्य दुसर्या आंधळ्याला वाट दाखवू शकतो काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय?
“तुम्ही मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे का म्हणता आणि मी जे सांगितले ते करीत नाही?
असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो.
जे लोकांनी ऐकावे ते सांगून पूर्ण केल्यावर, येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला.
त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.
ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे,
म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही.
आणि याकारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.
येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलींमध्ये सुद्धा दिसून आला नाही.”
त्यानंतर लगेच, येशू नाईन नावाच्या गावी गेले आणि त्यांचे शिष्य आणि मोठा जमावही त्यांच्याबरोबर गेला.
ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता.
प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”
नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!”
तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.
आणि त्यांना प्रभूकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतर कोणाची वाट पाहावी?”
ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्या कोणाची वाट पाहावी?”