मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.

  2. मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.

  3. आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.

  4. तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  5. तो बालक वाढत गेला आणि बलवान झाला; तो शहाणपणाने भरलेला होता आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा होती.

  6. येशूंचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणासाठी यरुशलेम येथे जात.

  7. जेव्हा येशू बारा वर्षांचे होते, तेव्हा रिवाजाप्रमाणे ते सणासाठी तिथे गेले.

  8. सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती.

  9. ते त्यांच्याच बरोबर येत आहेत, असा विचार करून एक दिवसाची वाट चालून गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे त्याला शोधण्यास सुरुवात केली.

  10. पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले.

  11. तीन दिवसानंतर त्यांना ते मंदिराच्या परिसरात सापडले, शिक्षकांमध्ये बसून आणि त्यांचे ऐकून त्यांना ते प्रश्न विचारत होते.

  12. प्रत्येकजण जो त्यांचे ऐकत होता तो त्यांची बुद्धी आणि त्यांच्या उत्तरांनी आश्चर्यचकित झाला होता.

  13. त्यांना पाहून त्यांचे आईवडील विस्मित झाले. आईने विचारले, “मुला, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी चिंतित होऊन तुला शोधत आहोत.”

  14. त्यांनी म्हटले, “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?”

  15. परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही.

  16. नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या.

  17. आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.

  18. यशायाह संदेष्ट्याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.

  19. लोक अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात आश्चर्य करीत होते की कदाचित योहानच ख्रिस्त असले पाहिजे.

  20. योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.

  21. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”

  22. जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला,

  23. आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

  24. येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता.

  25. पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले,