मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवसांमध्ये दुसरा एक मोठा समुदाय जमला आणि त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नव्हते. येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले,

  2. “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही.

  3. मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.”

  4. शिष्यांनी उत्तर दिले, “इतक्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”

  5. येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”

  6. त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. मग त्यांनी त्या सात भाकरी घेतल्या आणि त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले, नंतर त्याचे तुकडे करून ते त्यांनी शिष्यांना दिले आणि त्यांनी तसे केले.

  7. त्यांच्याजवळ थोडे लहान मासेही होते; त्यावरही येशूंनी आभार मानले आणि लोकांना वाढावयास सांगितले.

  8. तिथे सुमारे चार हजार लोक उपस्थित होते. त्यांना निरोप दिल्यानंतर,

  9. येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.

  10. तिथे परूशी लोक आले व त्यांना प्रश्न विचारू लागले. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी आकाशातून चिन्ह मागितले.

  11. हे ऐकून त्यांनी एक दीर्घ निःश्वास सोडला आणि म्हणाले, “ही पिढी चिन्ह का मागते? खरोखर या पिढीला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.”

  12. नंतर ते त्यांना सोडून निघून गेले व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.

  13. “सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”

  14. परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?

  15. पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “बारा” त्यांनी उत्तर दिले.

  16. येशूंनी त्यांना विचारले, “अजूनही तुम्हाला समजत नाही का?”

  17. ते बेथसैदा येथे आले, तेव्हा काही लोकांनी एका आंधळ्या मनुष्याला त्यांच्याकडे आणले आणि येशूंनी त्याला स्पर्श करावा अशी विनंती केली.

  18. येशूंनी त्या आंधळ्या मनुष्याला हाताशी धरून गावाबाहेर नेले. त्याच्या डोळ्यांमध्ये थुंकल्यावर व त्याच्यावर हात ठेवल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “आता तुला काही दिसते का?”

  19. तेव्हा येशूंनी पुनः आपले हात त्याच्या डोळ्यांवर ठेवले. तेव्हा त्याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी प्राप्त झाली व त्याला सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.

  20. “या गावात जाऊ नकोस,” येशूंनी अशी ताकीद देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले.

  21. येशू आणि त्यांचे शिष्य कैसरीया फिलिप्पाच्या गावात गेले. वाटेत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे असे लोक म्हणतात?”

  22. “परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”

  23. “ही गोष्ट कोणालाही सांगू नका.” असे येशूंनी त्यांना निक्षून सांगितले.

  24. यानंतर येशू त्यांना शिकवू लागले की, मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावी, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जिवे मारले जावे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.

  25. ते या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले आणि पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला.