मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”

  2. हे पाहण्याकरिता लोक धावत तिथे येत आहेत, हे पाहून येशूंनी अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.”

  3. परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.

  4. नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”

  5. त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”

  6. ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला,

  7. कारण ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते. ते त्यांना म्हणाले, “मानवपुत्राला मनुष्यांच्या हाती धरून दिले जाईल. ते त्याला जिवे मारतील, पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”

  8. परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.

  9. मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”

  10. ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”

  11. मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,

  12. “जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”

  13. योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.”

  14. येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही.

  15. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.

  16. “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल.

  17. येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले.

  18. काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”

  19. त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?”

  20. येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले.

  21. नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले.

  22. त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.

  23. लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.

  24. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.

  25. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”