- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
येशूंनी वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि मग पेत्राला ते धमकावून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”
नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलाविले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.
कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तो त्याचा जीव वाचवेल.
ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
ते त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, परमेश्वराचे राज्य सामर्थ्याने आलेले पाहतील तोपर्यंत मरणाचा अनुभव घेणार नाहीत.”
सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले, तिथे ते एकटे असताना त्यांच्यासमोर येशूंचे रूपांतर झाले.
त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही.
तिथे त्यांच्यासमोर एलीयाह आणि मोशे प्रकट झाले आणि ते येशूंबरोबर संवाद करू लागले.
तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण या ठिकाणी तीन मंडप उभारू या—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”
इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”
मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही.
ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही जे पाहिले त्याविषयी, मानवपुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.
नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”
येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे?
पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.”
जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले.
येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले.
येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?”
गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे;
ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.”
येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.”
त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला.
“हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले. वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून,
त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.”
“जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”