मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत.

  2. अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.

  3. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य नाही, पवित्र आत्मा माझ्या विवेकबुद्धीला पुष्टी देतो.

  4. मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते.

  5. पूर्वज हे त्यांचेच आहेत, त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची, जे सर्वोच्च परमेश्वर आहेत, शारीरिक वंशावळी समजते. त्यांची सर्वकाळ स्तुती असो! आमेन.

  6. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”

  7. शास्त्रलेख फारोहला सांगते: “मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.”

  8. यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात.

  9. तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?”

  10. त्यांनी हे अशासाठी केले की पूर्वीच तयार केलेल्या दयेच्या पात्राला त्यांच्या वैभवाची धनसंपत्ती प्रकट करावी.

  11. होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,”

  12. आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे असे म्हणतील.”

  13. यशायाहने आधी म्हटल्याप्रमाणे: “सेनाधीश प्रभूने जर आमचे वंशज वाचविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो आणि गमोरासारखी आमची गत झाली असती.”

  14. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  15. कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे.

  16. पण विश्वासाने मिळणारे नीतिमत्व सांगते: “असे आपल्या मनात म्हणू नका की, ‘स्वर्गात कोण चढेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी)

  17. “किंवा ‘खाली पाताळात कोण उतरेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला मेलेल्यांमधून वर आणण्यासाठी)

  18. “येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.

  19. शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.”

  20. यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात,

  21. परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.”

  22. ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील?

  23. परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”

  24. यशायाह धिटाईने म्हणाला, “ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे; ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.”

  25. इस्राएलाबद्दल तो म्हणतो, “आज्ञा न पाळणार्‍या आणि हट्टी लोकांसाठी मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”