मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.”

  2. आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.”

  3. आणि यशायाह संदेष्टा म्हणतो, “इशायाचे मूळ उगवेल, व ते राष्ट्रांचा शासक होण्यास उभे राहतील; गैरयहूदीयांच्या आशा त्यांच्यामध्येच आहेत.”

  4. की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.

  5. यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो.

  6. गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही.

  7. चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.

  8. जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये.

  9. यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”

  10. आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे.

  11. बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.

  12. मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.

  13. प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.

  14. त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या सदिच्छा कळवा. माझा प्रिय मित्र अपैनत यालाही सदिच्छा, आशियामध्ये त्यानेच प्रथम ख्रिस्ताचा स्वीकार केला.

  15. माझे यहूदी बंधू अंद्रोनीक व युनिया, जे माझ्याबरोबर तुरुंगात होते त्यांना पण सदिच्छा द्या. प्रेषितांमध्ये त्यांचे स्थान अवर्णनीय आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तात होते.

  16. प्रभूमध्ये प्रिय मित्र आंप्लियात याला माझ्या सदिच्छा कळवा.

  17. तसेच ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सदिच्छा कळवा.

  18. अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा.

  19. माझा नातेवाईक हेरोदियोन याला सदिच्छा द्या. नार्सिसाच्या घरातील जे प्रभूमध्ये आहेत त्यांना सदिच्छा कळवा.

  20. त्रेफैना आणि त्रेफोसा, या स्त्रियांनी प्रभूमध्ये खूप श्रम केले, त्यांना सदिच्छा कळवा. प्रिय मैत्रीण पर्सिस, हिला सदिच्छा कळवा. तिने प्रभूमध्ये अतिशय कष्ट घेतले.

  21. प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.

  22. एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सदिच्छा कळवितात.

  23. कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.

  24. शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो.

  25. हे पत्र लिहिणारा, मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला सदिच्छा देत आहे.