Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता;
नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,
आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे.
आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.
किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच,
जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो.
धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”
असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.
अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती.
परंतु आपल्यासाठीही आहे, ज्यांनी प्रभू येशूंना मरणातून उठविले त्यावर विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यालाही नीतिमान ठरवेल.
ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे,
आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.
परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!
आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे.
आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.
तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली.
कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!
यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते.
कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.
यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.
ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का?