Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’
“नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ”
त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.”
मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले.
ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते. पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे.
“मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे.
आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’
“मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ “प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,
आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे.
मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे
यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’
त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.”
तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला.
त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले!
मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला
त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते,
ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले.
त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे.
तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात.
रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे:
प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
ज्या परमेश्वराची सेवा मी माझ्या आत्म्याने व त्याच्या पुत्राच्या शुभवार्तेचा संदेश गाजवून करतो, ते माझे साक्षी आहेत की, मी नेहमीच तुमची आठवण करीत असतो.
शुभवार्तेची मला लाज वाटत नाही, कारण त्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाचे, प्रथम यहूदीयांचे नंतर गैरयहूदीयांचे तारण करण्यास ती परमेश्वराचे सामर्थ्य आहे.
कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील.