मुख्य मजकुरावर जा

Isaac

123 वचने · 12 कुटुंब सदस्य

Isaac चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन.

  2. पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.”

  3. अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले.

  4. इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली.

  5. जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता.

  6. ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली.

  7. तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.”

  8. तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.

  9. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

  10. अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.

  11. अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले,

  12. इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”

  13. परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले;

  14. याऐवजी तू माझ्या मायदेशात माझ्या नातेवाईकांकडे जाशील आणि माझा पुत्र इसहाकासाठी एक वधू शोधून आणशील.”

  15. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”

  16. दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता.

  17. एके दिवशी संध्याकाळी तो मनन करीत शेतातून फिरावयास निघाला असताना, त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला काही उंट येताना दिसले.

  18. रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली

  19. आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.

  20. मग इसहाकाने रिबेकाहला आपली आई साराहच्या तंबूमध्ये आणले. त्याने रिबेकाहशी विवाह केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम बसले; आणि आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्यामुळे त्याला सांत्वन मिळाले.

  21. अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली.

  22. परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले.

  23. त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले,

  24. अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला.

  25. अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे: अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला,