God
God चा उल्लेख असलेली वचने
आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.”
सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.”
परंतु हेशबोनाच्या सीहोन राजाने आम्हाला जाण्यास परवानगी दिली नाही. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्याला तुमच्या हातात देण्यासाठी त्याचा आत्मा हट्टी आणि त्याचे हृदय कठीण केले होते.
मग याहवेह म्हणाले, “सीहोन राजाचा देश तुम्हाला देण्यास मी आता सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही तो देश ताब्यात घ्याल, तेव्हा तो कायमचा तुमच्या मालकीचा होईल.”
परंतु याहवेह आमच्या परमेश्वराने त्याला आमच्या अधीन केले, आम्ही त्याला, त्याच्या पुत्रांसह संपूर्ण सेनेला चिरडून टाकले.
आर्णोन खोर्याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले.
मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.
याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”
याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही.
त्यावेळी मी तुम्हाला आज्ञा दिली: “याहवेह तुमच्या परमेश्वराने हा प्रदेश तुम्हाला वतन म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही त्यात वस्ती करण्यापूर्वी तुमच्या सक्षम योद्ध्यांना शस्त्रे धारण करून यार्देन ओलांडून इतर इस्राएलाच्या पुढे पाठवावे.
यार्देनेच्या पश्चिमेला याहवेह देत असलेल्या देशात तुमचे इस्राएली बांधव वस्ती करेपर्यंत आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्याप्रमाणे तुम्हाला विसावा दिला आहे, त्याप्रमाणे त्यांनाही विसावा मिळेपर्यंत, तुमच्या बांधवांना मदत करा. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिला आहे येथे तुम्ही आपल्या वतनावर परत यावे.”
नंतर मी यहोशुआस म्हणालो: “याहवेह तुझ्या परमेश्वराने सीहोन व ओग या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्याने पाहिले आहेस. तुम्ही जिथे जात आहात तेथील सर्व राज्यांचेही याहवेह असेच करतील.
त्यांना तू भिऊ नको; कारण याहवेह तुझे परमेश्वर स्वतः तुझ्यासाठी त्यांच्याशी लढतील.”
त्यावेळी मी याहवेहला विनवणी केली:
“हे सार्वभौम याहवेह, तुमची महानता आणि तुमचा बलवान हात तुमच्या दासाला दाखविण्यास तुम्ही आरंभ केला आहे. स्वर्गात किंवा पृथ्वीवर असे कोणते दैवत आहे की, ज्याला तुमच्यासारखी थोर व महान कृत्ये करता येतील?
हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”
पण तुमच्यामुळे याहवेह माझ्यावर रागावले आणि त्यांनी त्या वचनदत्त देशात मला जाऊ दिले नाही. ते मला म्हणाले, “पुरे कर. ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस.
आता, अहो इस्राएली लोकहो, मी जे विधी व नियम तुम्हाला शिकवणार आहे ते ऐका. त्यांचे पालन करा म्हणजे जिवंत राहाल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर तुम्हाला देत आहेत, तो देश ताब्यात घ्या.
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही फक्त पालन करा, त्यात काही भर घालू नका आणि काही कमी करू नका.
बआल—पौर येथे याहवेहने काय केले हे तुम्ही आपल्या डोळ्याने पाहिले आहे. याहवेह तुमच्या परमेश्वराने बआल-पौराच्या मागे चालणार्या सर्वांचा नाश केला,
पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात.
पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे.
याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात?
ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.”
मग याहवेह तुमच्याशी अग्नीतून बोलले, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले, परंतु त्यांची आकृती तुम्हाला दिसली नाही; फक्त वाणी ऐकली.