मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशेला म्हणाले,

  2. मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा,

  3. याहवेह मोशेला म्हणाले,

  4. इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.

  5. यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  6. नंतर याहवेह मोशेला म्हणाले:

  7. ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ”

  8. ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे.

  9. नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे.

  10. सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा.

  11. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले.

  12. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.

  13. चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.

  14. आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;

  15. पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”

  16. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.

  17. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे,

  18. याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!

  19. न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”

  20. नंतर आम्ही होरेब येथून प्रस्थान केले व जो तुम्ही पाहिला होता अशा अफाट आणि भयानक अशा अरण्यातून प्रवास करीत, याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शेवटी अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात पोहोचलो आणि आम्ही कादेश-बरनेआस आलो.

  21. तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्‍यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत.

  22. पाहा, याहवेह तुमच्या परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुमच्या पूर्वजांचे देव परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे वर जा आणि तो आपल्या ताब्यात घ्या. घाबरू नका; निराश होऊ नका.”

  23. तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.”

  24. परंतु तुम्ही वर जाण्यास नाकारले व याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले.

  25. आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.